IMG-LOGO
नाशिक शहर

मतदान करा आणि दाढी कटिंग मध्ये ५० टक्के सूट मिळवा

Sunday, Oct 20
IMG

राज्यात सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असून येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून येणाऱ्या नागरिकास दाढी कटिंग मध्ये ५०% सूट दिली जाणार आहे.

मतदान करा आणि दाढी कटिंग मध्ये ५० टक्के सूट मिळवा नाशिक दि.२० l राज्यात सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असून येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून येणाऱ्या नागरिकास दाढी कटिंग मध्ये ५०% सूट दिली जाणार आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामवाडी येथील आदर्श नगर चे रहिवासी असलेले प्रभाकर सैंदाने यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नामी शक्कल लढवत आपल्या दुकानात जो ग्राहक मतदान करून दाढी कटिंग करण्यास येईल त्यास चक्क ५० टक्के सूट दिली जाणार असल्याची पाटी त्यांनी आपल्या दुकानाबाहेर लावली असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील त्यांनी ग्राहकांना ही सवलत दिली होती.सदर सवलत ही मतदानाच्या दिवसापूर्ती मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाकर सैंदाने,आदर्श सलून रामवाडी :- लोकशाही बळकट व्हावी यासाठी संविधानाने आपल्याला मतदानाचा करण्याचा मूलभूत हक्क दिला आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने मी ही सवलत सुरू केली.

Share: