IMG-LOGO
मतदार राजा

विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत; राष्ट्रीवादीचे 'कमबॅक'

Thursday, Oct 24
IMG

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांतील मतमोजणी निकालाचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले असून भाजपा आणि शिवसेना युतीने बहुमताची आघाडी घेतली असली तरी यंदा भाजपाच्या जागा घटल्या आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांतील मतमोजणी निकालाचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले असून भाजपा आणि शिवसेना युतीने बहुमताची आघाडी घेतली असली तरी यंदा भाजपाच्या जागा घटल्या आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. अपक्ष आणि बंडखोरांनी तब्बल 27 जागा मिळविल्या असून सत्तास्थापनेत या जागांना महत्त्व येणार आहे. कॉँग्रेस 46, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमला पराभव पत्करावा लागला असला, तरी धुळे आणि मालेगाव मध्य अशा दोन ठिकाणी एमआयएमचा उदय झाला आहे. मनसेला एक जागा मिळाली असून बच्चू कडू यांच्या पक्षाने 2 जागा मिळविल्या आहेत, तर स्वाभीमानी पक्षाने 1 जागा मिळविली आहे. जनसुराज्य पार्टीने एक, क्रांतीकारी शेतकरी पक्षाने 1 जागा मिळविली आहे. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. पंकजा मुंडेंसह पाच मंत्र्यांना आणि भाजपा आणि शिवसेनेत आलेल्या 19 जणांना पराभव चाखावा लागला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे युवा उमेदवार रोहित पवार, यांच्यासारखे तरुण उमेदवारही यंदा लोकांनी विधानसभेत निवडून दिले आहेत. मात्र त्याचवेळेस भाजपाचे तिकीट नाकारलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी तिकीट दिलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभव झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे विदयमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले आहे. कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे भोकरमधून निवडून आले आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव अमित आणि धीरज यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजय झाला आहे. अशा आहेत पार्टीनुसार मिळालेल्या जागा (स्त्रोत : निवडणुक आयोग संकेतस्थळ)महाराष्टपरिणाम स्थिति288 निर्वाचन क्षेत्रों में से 288 की ज्ञात स्थितिदल का नामविजयीआगेकुलऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन202बहुजन विकास अघाड़ी213भारतीय जनता पार्टी6538103कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्‍ससिस्‍ट)101निर्दलीय10313इंडियन नेशनल कांग्रेस291746जन सुराज्य शक्ति101क्रांतिकारी शेतकरी पार्टी101महाराष्ट्र नवनिर्माण सेना101नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी411253पीजैन्ट्स एण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इण्डिया011प्रहर जनशक्ती पक्ष202राष्ट्रीय समाज पक्ष011समाजवादी पार्टी202शिवसेना451257स्वाभिमानी पक्ष101कुल20385288

Share: