IMG-LOGO
मतदार राजा

निकालाआधीच भाजपा कार्यालय सजले; बाबा केदारनाथ देवेंद्र फडणवीसांवर प्रसन्न होणार?

Thursday, Oct 24
IMG

महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकांच्या मतदानाची मोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिदद्ध झालेल्या एक्सीट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येईल असे संकेत आहेत. तर काही एक्सीट पोलमध्ये भाजपाची एकहाती सत्ता येईल असे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणत्या पक्षाल बहुमत मिळेल हे सकाळी 11 पर्यंत कळण्याची शक्यता आहे.

एक्सीट पोलच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई कार्यालय सजविण्यात आले असून, विजयाचे पोस्टरही तेथे सज्ज करण्यात आले आहे.दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सपत्नीक केदारनाथाचे दर्शन घेतले. आजच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर याला महत्व असून बाबा केदारनाथ त्यांना बहुमतरुपी आशीर्वाद देणार का? याची चर्चा आहे.

Share: