अल्पसंख्याक विभागाच्या अनुदान योजनांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी केले आहे.
अल्पसंख्यांक विभागाच्या अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहननाशिक दि.६ l अल्पसंख्याक विभागाच्या अनुदान योजनांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी केले आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविदयालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासंदर्भात अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक शाळांकडून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतिम प्रस्ताव 31 डिसेंबर 2019 पर्यंत शासनास सादर केला जाणार आहे.तरि सन 2019-20 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा नियोजन कार्यालय, नाशिक कळविले आहे..