गेली ५ वर्षे सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून “शेतकऱ्यांचे मरण हेच युती सरकारचे धोरण” असल्याचे सिद्ध केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.
गेली ५ वर्षे सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून “शेतकऱ्यांचे मरण हेच युती सरकारचे धोरण” असल्याचे सिद्ध केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे. गेली काही वर्षे कांदा, टमाटा, वांग्यांसह इतर शेतमालाला सातत्याने कवडीमोल भाव मिळत होता. त्यात उत्पादन शुल्क देखील वसुल न झाल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कुठलीही मदत न देता शेतकरी विरोधी धोरणे राबविल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. गेली काही वर्षे असलेलल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हतबल झाला असून खोटी आश्वासने देवून गेली ५ वर्ष भाजप – शिवसेना युती सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शेतकरी बांधव भाजप शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.