काहीवेळेस अशा या टिप्समुळे आपल्या वस्तूंचे नुकसान होतं नाही. वस्तू अधिक काळ टिकतात.
1 ) लोकरीचे कपडे ठेवताना त्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून ठेवावी म्हणजे कपडे खराब होत नाहीत.2 ) पिशवी किंवा बॅगेच्या चेनला व्हॅसलिन लावून ठेवावे म्हणजे चेन गंजून नादुरुस्त होत नाही.3 ) फाटलेली नोट चिकटवण्यासाठी त्यावर थोडासा साखरेचा घट्टसर पाक लावावा आणि नोट सुकवावी म्हणजे चांगली चिकटते.4 ) ऑरगंडी साड्या थोड्या वाळताच लगेचच इस्त्री करावी. यामुळे इस्त्री चांगली होते तसेच फारसा त्रास होत नाही.5 ) चप्पल, बूट पॉलिश करायचे असल्यास लिंबाची साल चोळावी आणि चांगले वाळल्यानंतर पॉलिश करावे.यामुळे चकचकीत पॉलिश होते. 6 ) केस धुतल्यावर थोडेसे व्हिनेगर चोळल्यास ते मऊ आणि चमकदार होतात.