IMG-LOGO
शिक्षण

अकरावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

Friday, May 24
IMG

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सराव करता यावा म्हणून 22 आणि 23 मे असे दोन दिवस ठरवण्यात आले होते.

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी च्या निकालानंतर आता दहावीचा निकाल (SSC Result) कधी जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशामध्ये आता आज 24 मे पासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरले जात असल्याने आजपासून विद्यार्थ्यांना भाग एक भरता येणार आहे. https://11thadmission.org.in/ या पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सराव करता यावा म्हणून 22 आणि 23 मे असे दोन दिवस ठरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना https://11thadmis- sion.org.in/ या पोर्टलवर डमी लॉगिन आणि यासाठीच्या सुविधा दिल्या जातील. पण, प्रत्यक्ष अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 24 मेपासून सुरू होणार आहे. दहावीच्या निकालानंतर दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा FCFS ही फेरी होणार नाही. प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहील.

Share: