राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.
पुणे, दि. २७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला.राज्यातील निकालाची विभागनिहाय आकडेवारी विभाग निकालाची टक्केवारीकोकण 99.01 टक्केकोल्हापूर 97.45 टक्केपुणे 96.44 टक्केमुंबई 95.83 टक्केअमरावती 95.58 टक्केनाशिक 95.28 टक्केलातूर 95.27 टक्केछत्रपती संभाजीनगर 95.19 टक्केनागपूर 94.73 टक्के