IMG-LOGO
मुंबई

अरबी समुद्रात उद्या मोठे चक्रीवादळ येणार

Friday, May 14
IMG

राज्यात राहणार्‍या नागरिकांसाठी अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, दि. १४  मे :  किनारपट्टी परिसरातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. 16 मे रोजी सकाळपर्यंत अरबी समुद्रात मोठे चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी दक्षिण भारतात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता आहेत. येत्या चार दिवसांत कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर या राज्यात राहणार्‍या नागरिकांसाठी अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Share: