अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे.
केळी म्हणजे शरीरासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त फळ..असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता. दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.तसेच कधीकधी रोजची धावपळ, घरातील, ऑफिसमधील कामांचा ताणतणाव इत्यादी कारणांमुळे त्वचेची देखभाल करणे अनेकांना शक्य होत नाही. यावर पर्याय म्हणून काही जण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करतात. पण या ट्रीटमेंटमुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. खर्च आणि त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी.नितळ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही स्वयंपाकघरातील फळ आणि भाज्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क तयार करू शकता. दुसरं फळं म्हणजे ड्रॅगनफ्रूट या फळाचे नाव थोडे विचित्र वाटत असले तरी त्याच्या नावावर न जाता त्यापासून होणारे फायदे ऐकाल तर तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. भरपूर प्रमाणात सी व्हिटामिन, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम असलेले हे फळं खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. पल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.