IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik : शिंदेगावातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

Tuesday, Sep 10
IMG

चौघे जण भाजले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक, दि. १०  :  येथील शिंदेगाव येथे दुपारी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत एक कामगार भाजला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अनेक कामगार गोदामात अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. गौरव विसपुते यांच्या शिंदेगावात श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्यांचे गोदाम आहे. आज दुपारी एक वाजाताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. गोदामातील दोन कर्मचारी, ट्रक चालक आणि क्लिनर असे चौघे जण भाजले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Share: