IMG-LOGO

उद्धव ठाकरे यांना धक्का; आमश्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश

Sunday, Mar 17
IMG

आक्रमक आदिवासी चेहरा असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यासाठी ठाकरेंना अनेक नेत्यांची नाराजी सहन करावी लागली होती.

मुंबई, दि. १७ : विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाडवींचे पक्षामध्ये स्वागत केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. २०१९ मध्ये आपण लोकसभा आणि विधानसभा लढवल्या त्यावेळी एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो होता. परंतु निकाल लागल्यानंतर पक्षप्रमुखांनी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे सगळेच नाराज झाले होते. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर, असं राजकारणात चालत नाही. राजकारणात बुद्धीमत्ता, विचारधारा पाळावी लागते. असे त्यांनी सांगितले. दरम्यान,एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगणारे आमदार आमश्या पाडवी रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्ष प्रवेशासाठी रवाना झाले होते. त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली. पण दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. पण आक्रमक आदिवासी चेहरा असल्याने ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यासाठी ठाकरेंना अनेक नेत्यांची नाराजी सहन करावी लागली होती.https://twitter.com/mieknathshinde/status/1769317221791371540?t=c9t_ydScQpNzYJ-vTMeleA&s=19

Share: