आज जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार ७०८ जण बरे होऊन घरी गेले आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक, दि. २६ ऑगस्ट : नाशिक जिल्ह्यात मालेगावात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना विषाणूने नाशिक शहराकडे आपला मोर्चा वळविला आहे. आज (दि.२६) शहरात तब्बल ६८३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्यात आज एकूण ९९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार ७०८ जण बरे होऊन घरी गेले आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामिणमध्ये २५०, नाशिक शहरात ६८३, मालेगाव ५६, जिल्हा बाह्य २ असे एकूण ९९१ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिक शहरात ७, ग्रामीण ६, मालेगाव १ असे १४ रुग्ण दगावले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण मृतांची आकडेवारी ८१३ वर पोहचली आहे.