IMG-LOGO
मुंबई

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलं - अनिल देशमुख

Wednesday, Aug 19
IMG

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे. बिहार राज्यात पुढील काळात निवडणुका आहेत

मुंबई दि १९ ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. सीबीआय अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आवश्यक असेल ते सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल. मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या प्रकारे तपास केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम १७४ अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे. बिहार राज्यात पुढील काळात निवडणुका आहेत आणि या निवडणुका लक्षात घेऊन काही पक्षाचे नेते यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Share: