९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती.
औरंगाबाद, नाशिक, दि. ८ जानेवारी : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी स्थळाची निवड झाली. या संमेलनात कोरोना काळात घेण्यात येणाऱ्या सर्व नियमांचे पालन करत, प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येईल असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. यंदाचे साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. तसेच या साहित्य संमेलनाचं आयोजकत्व नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे देण्यात आलं आहे.