IMG-LOGO
साहित्य संमेलन

साहित्य संमेलनातील बाल साहित्य संमेलन समितीच्या मुख्य समितीची बैठक

Friday, Feb 12
IMG

गप्पागोष्टी हा एक वेगळा कार्यक्रम लेखकांशी मुलांचा संवाद याअंतर्गत होणार आहे. परिसंवादांमध्ये बाल साहित्य लिहिणारे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांचा तो परिसंवाद असेल.

नाशिक, दि. ११ फेब्रुवारी : ९४  व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील  बाल साहित्य संमेलन समितीच्या मुख्य समितीची बैठक झाली. त्यात बालकवी कट्ट्या अंतर्गत विविध समित्याची नियुक्ती करण्यात आली त्यात नोंदणी समिती, निवड समिती, संपर्क समिती, मंच व्यवस्थापन, प्रमाणपत्र समिती, सूत्रसंचालन समिती, कथा सादरीकरण समिती, परिसंवाद समिती, गप्पा-गोष्टी समिती तसेच सल्लागार समिती तयार केली. या बैठकीमध्ये जे बालसाहित्यिक मुलांसाठी लिहीत आहेत त्यांच्यासाठी चा एक परिसंवाद आयोजित करण्यात यावा असेही या बैठकीमध्ये ठरलेले आहे.  तर गप्पागोष्टी हा एक वेगळा कार्यक्रम लेखकांशी मुलांचा संवाद याअंतर्गत होणार आहे. परिसंवादांमध्ये बाल साहित्य लिहिणारे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांचा तो परिसंवाद असेल. समितीमध्ये स्थापन केल्या सदस्याची नावे पुढीलप्रमाणे  निवड आजच्या मुख्य समिती मध्ये करण्यात आली नोंदणी समिती - अभिजीत साबळे, श्रीराम कुलकर्णी तर निवड समितीमध्ये - संजय वाघ, संदीप देशपांडे, उत्तम कोळगावकर, राजेंद्र सोमवंशी, अरुण इंगळे, तसेच संपर्क समितीमध्ये - गीता बागुल, राजा वर्टी, अर्चना सूर्यवंशी -  मंच व्यवस्थापन - नीलेश गायधनी, अनिल माळी, केशव कासार, प्रमाणपत्र समितीमध्ये - प्रकाश वैद्य, संजय कुटूंरवार, पूजा गायधनी -  सूत्रसंचालन समिती -  राजेंद्र उगले, सुरेखा बोराडे, प्रशांत केंदळे, किरण भावसार, संयुक्त कुलकर्णी, श्री व सौ क्षेमकल्याणी, चित्रा थोरे, आरती बोराडे  तसेच कथासादरीकरणमध्ये - नोंदणी समिती - किरण भावसार, विलास पंचभाई - निवड समिती – राज शेळके, सुभाष सबनीस,  विवेक उगलमुगले, सुनील बस्ते,  संजय बोराडे, सुहासिनी बुरकुले, आणि सल्लागार समितीमध्ये मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे सर्व सदस्य मुख्य समितीच्या सूचनेनुसार पुढील कार्यक्रम हाती घेतील अशी माहिती संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर व बालकट्टा प्रमुख संतोष हुदलीकर, सोमनाथ मुठाळ, योगीनी जोशी यांनी दिली.

Share: