IMG-LOGO
महाराष्ट्र

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

Friday, Mar 29
IMG

अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या.

अलिबाग, दि. २९ : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (दि. २९) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी २ पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती

Share: