यापूर्वीही एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानमधील घरामधून फोन आल्याचे आरोप करण्यात आले होते.
जळगाव, दि. १७ : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगावमधील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन धमकीचे फोन आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.यापूर्वीही एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानमधील घरामधून फोन आल्याचे आरोप करण्यात आले होते. दाऊदची पत्नी महजबी शेखच्या मोबाईल नंबरवरुन २०१५ आणि २०१६ च्या दरम्यान खडसेंच्या मोबाईल क्रमांकावर अनेकदा कॉल आले होते, असा आरोप आम आदमी पक्षाच्या तेव्हांच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला होता. त्यानंतर एटीएसनं या प्रकरणात तपास करत खडसेंना क्लीनचीट दिली होती.आता ताज्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा दाऊदचं नाव चर्चेत आलं आहे.