सगे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याला मतदान करा. असं आवाहन जरांगे- पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.
अंतरवाली सराटी, दि. ३१ : राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाज लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. ज्यांनी आरक्षणाचं काम केलं नाही ते उमेदवार पाडा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मराठा समाज निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सगे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याला मतदान करा. असं आवाहन जरांगे- पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.