IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Loksabha 2024 : पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे; छगन भुजबळ यांचा सल्ला

Thursday, Apr 25
IMG

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. असे म्हटले आहे.

नाशिक, दि. २५ : महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आता पंकजा मुंडे यांनी थेट नाशिकमधून प्रीतम मुंडेंना निवडणुकीसाठी उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानावरून मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिला असून पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत, असे नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीचा ताकद अधिक वाढवणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने या जागेवरील दावा अद्याप सोडलेला नाही. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. असे म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून शिंदे आणि पवार गटात बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप तरी इथे कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच भुजबळ यांनी आपण लढणार नसल्याचं म्हणत त्यांचा दावा मागे घेतला. पण तरीही नाशिकची जागा ही शिंदे गटाला गेली की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता आली नाही.

Share: