IMG-LOGO
महाराष्ट्र

अजित पवारांच्या 'कचाकचा बटण दाबा' वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट

Friday, Apr 26
IMG

उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा , अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केल होते.

बारामती, दि. २६ :  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित कचाकचा बटण दाबा या वक्तव्यावरुन त्यांना क्लीन चिट दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे. भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्यं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विरोधकांकडून देखील प्रचंड टीका करण्याात आली. त्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा , अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केल होते. 

Share: