IMG-LOGO
महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर ठाम; संजय राऊतांनी मानले भाजपचे आभार

Friday, Apr 19
IMG

कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात.

सांगली, दि. १९ : "तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. बाई तुम्हाला प्रेमाने बोलावेल पण तुम्ही मोहाला बळी पडू नका. आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा मारला की जायचं नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे. ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला तिचा पराभव करणं हे आमचं प्रथम काम आहे" असं संजय राऊत म्हणाले होते. यावर त्यांनी प्रतिक्रिया देत मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचा उपयोग करतो, मराठी भाषा कोणी शिकवायला नको, मी चाळीस वर्षे बाळासाहेब यांच्या सोबत काम केलेला माणूस आहे,मी पत्रकार आहे संपादक आहे,त्यामुळे मला मराठी भाषा कोणी शिकवू नये, असंही राऊत यांनी म्हटले आहे.तसेच नारायण राणे यांच्या उमेदवारीवरून त्यांनी  भाजपचे आभार मानले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत अशी लढाई होणार आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात तेच हवे होते. भाजपने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे म्हटले आहे.   

Share: