IMG-LOGO
महाराष्ट्र

शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लिनचीट

Wednesday, Apr 24
IMG

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे.

पुणे, दि. २४ : ऐन निवडणुकीत अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २५ हजार कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा दिलाय. गुरु कमोडिटीकडून  जंरडेश्वर सहकारी साखर कारखाना चालवयला घेतला होता. त्यात आर्थिक गुन्हे शाखेला काहीही चुकीचं आढळून आलेलं नाही. मात्र सक्तवसुली संचलनालयानं या प्रकरणात ठपका ठेवला होता. गुरु कमोडिटी आणि जरंडेश्वर साखर कारखाना यांनी या प्रकरणात सगळ्या गोष्टी केवळ कागदावर दाखवल्या होत्या, असा उल्लेख सक्तवसुली संचलनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रात आहेत.शिखर बॅक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवार या जय अ‍ॅग्रोटेकच्या संचालक होत्या पण त्यांना पदाचा २ वर्षापूर्वी म्हणजेच २०१० मध्ये राजीनामा दिला होता असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनी लॉड्रींगचा ठपका ठेवला होता. शिवाय आता या प्रकरणा बरोबर सुनेत्रा पवार यांचा काहीही संबंध नाही असे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चीट देण्याची शिफारस आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे केली होती. शिवाय क्लोजर रिपोर्टमध्ये बँकेला कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचेही  म्हटले आहे. सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. याआधी अजित पवार यांनाही क्लीन चिट देण्यात आली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Share: