नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही.
नाशिक, दि. २७ : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी व भरण्याची लगबग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी नाशिकसाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले तर दिंडोरीसाठी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. पहिल्या दिवशी दिंडोरीत माकपतर्फे जिवा पांडू गावित आणि या पक्षाचे डमी उमेदवार म्हणून सुभाष चौधरी या दोघांनी तर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना अद्यापही महायुतीकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यातच भाजपनं आपल्याला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितल्याचं म्हणत महंत अनिकेत शास्त्रींनी नाशिकचा पेच आणखी वाढवला आहे. पक्षश्रेष्ठींशी वेळोवेळी चर्चा झाली. माझे गुरु आणि भाजप खासदार साक्षी महाराज यांच्यासोबतही संवाद झाला. राज्य आणि केंद्रीय पातळीवर सकारात्मक चर्चा झाली असल्यानं येत्या २ दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करेन, असं अनिकेत शास्त्री म्हणाले आहेत.अनिकेत शास्री यांनी आपल्याला भाजप श्रेष्ठींनी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत असा दावा केला आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज ही घेतला आहे. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही.