IMG-LOGO
महाराष्ट्र

रामदास कदम व त्यांच्या मुलांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप; अनिल परब यांनी कागदपत्रंच दाखवली

Tuesday, Apr 02
IMG

खेडमधील जांबुर्डे गावात जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांच्या मुलांची गावात १५ गुंटे जागा होती.

 मुंबई, दि. २ : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. रामदास कदम यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून खेड नगरपालिकेचा भूखंड हडपल्याचा आरोप त्यांनी केला. या गैरव्यवहाराची कागदपत्रंच अनिल परब यांनी दाखवली. अनिल परब म्हणाले, खेडमधील जांबुर्डे गावात जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांच्या मुलांची गावात १५ गुंटे जागा होती. यांनी सरकारकडून १८.५ गुंट्याचा मोबदला वसूल केला. तोच प्लॉट एनए करण्याची परवानगी त्यांनी मागितलीय. भूसंपादन झालेली जमीन एनए करण्याची परवानगी कशी काय मागितली जाऊ शकते,' असा सवाल अनिल परब यांनी केला. येत्या काही दिवसांत आणखी १२ ते १३ घोटाळे उघड करेन, असा इशाराही परब यांनी केला.

Share: