IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : संपत्तीवर टॅक्स लावून अर्धी संपत्ती लुटण्याचा त्यांचा प्रयत्न, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Friday, Apr 26
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. मध्य प्रदेशातील मुरैना शहरात एका निवडणूक रॅलीला ते संबोधित करीत होते.

मुरैना, दि. २६ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता सरकारकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी ‘वारसा कर’ रद्द केला होता. याचा फायदा करून घेतल्यानंतर काँग्रेसला आता पुन्हा देशातील नागरिकांवर हा कायदा लादायचा आहे,’ असा असा आरोप  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. मध्य प्रदेशातील मुरैना शहरात एका निवडणूक रॅलीला ते संबोधित करीत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ही परिस्थिती स्वत:वर आली तर कायद रद्द केला. आता सत्तेच्या लालसेसाठी हे लोक तोच कायदा पुन्हा आणू पाहत आहेत. आपल्या परिवाराची चार-चार पिढ्यांची बिना टॅक्सची संपत्ती मिळवल्यानंतर आता ते सर्वसामान्यांची संपत्ती, तुमच्या मेहनतीची कमाई, जनतेने त्यांच्या मुलांसाठी ठेवलेली संपत्ती, त्यावर टॅक्स लावून अर्धी संपत्ती लुटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या वाडवडिलांनी मागे ठेवलेली निम्म्याहून अधिक मालमत्ता ‘वारसा करा’द्वारे काढून घेईल, असा आरोपही त्यांनी केला.

Share: