IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Loksabha 2024 : 'काळजी करू नका प्रीतम ताईला मी नाशिकवरून उभं करेन..', पंकजा मुंडेंच्या विधानाने नवा पेच

Thursday, Apr 25
IMG

नाशिकमधील मतदान हे राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात आहे.

नाशिक, दि.२५ :  “प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. नाशिकमधील मतदान हे राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात आहे. पण निवडणुकीच्या घोषणेपासूनच या मतदारसंघात महायुतीत काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीने या जागेवर दावा कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते.

Share: