केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. २५ कामगार या आगीत जखमी झाले आहेत.
जळगाव, दि. १९ : जळगाव शहरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे, तर चार कामगारांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. बुधवारी कामाची पहिली शिफ्ट सुरू झाल्यावर सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. २५ कामगार या आगीत जखमी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी उपचारार्थ दाखल जखमींपैकी किशोर दत्तात्रय चौधरी (वय ५०, रा. रेणुकानगर, मेहरूण), दीपक वामन सुवा (रा. विठोबानगर, कालिकामाता मंदिर, जळगाव) या दोन कामगारांचा गुरुवारी (ता. १८) मृत्यू झाला आहे.जखमींचा जबाब नोंदविल्यावर कंपनी मालक, व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक नोमेश रायगडे अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.