IMG-LOGO
राष्ट्रीय

EVM-VVPAT बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; EVM विरोधातीलसर्व याचिका फेटाळल्या

Friday, Apr 26
IMG

ईव्हीएम मतांची आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या.

दिल्ली, दि. २६ :  देशात लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत निकाल दिला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका फेटाळली आहे. VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या.सर्वोच्च न्यायालयाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या निर्देशानुसार सिंबल लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंबल लोडिंग युनिट (SLU) सील केलं जावं आणि त्यांना कमीत कमी 45 दिवस तसेच ठेवायला हवे. याशिवाय दुसऱ्या  निर्देशानुसार, निकालाची घोषणा झाल्यानंतर काही इंजिनियरांच्या टीमकडून तपासणी करावयाच्या ईव्हीएमच्या मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम मिळवण्याचा पर्याय उमेदवारांना असेल. यासाठी उमेदवारांना निकालाच्या घोषणेच्या सात दिवसांत अर्ज करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयात सर्व ईव्हीएम मतांची आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या. तसेच या वेळी न्यायालयाने बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली. देशातल्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. बॅलेट पेपर तसेच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यांच्या पडताळणी बाबतच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. कोर्टाचा या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी त्यांनी पेपर स्लिप मोजण्यासाठी यंत्रिक व्यवस्था राबवता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले.

Share: