IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी : नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला

Thursday, Apr 25
IMG

आता काँग्रेस एक पाऊल आणखी पुढे गेला असून तुम्हाला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरही कर लादला जाणार आहे.

सुरगुजा, दि. २५ : अख्खा काँग्रेस पक्ष वडिलोपार्जित संपत्ती मानून आपल्या मुलाबाळांना वारसाहक्काने दिली त्या लोकांना देशातील सामान्यांनी आपल्या मुलाबाळांना संपत्ती द्यावी हे मान्य नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. सरकारी आयुर्विमा कंपनी ‘एलआयसी’च्या घोषवाक्याचा आधार घेत प्रचासभेतील जनसमुदायाला उद्देशून मोदी म्हणाले की, तुम्ही मेहनतीने जमवलेली संपत्ती तुमच्या मुला-बाळांना मिळणार नाही. काँग्रेस सरकार ही संपत्तीही तुमच्यापासून हिरावून घेईल. काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, हाच त्यांचा मंत्र आहे! जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस अधिकाधिक कर लादून मारेल आणि तुमच्या पश्चातही तुमच्यावर वारसा कराचे ओझे लादेल, अशी टीका मोदींनी केली.मोदी म्हणाले की, आता काँग्रेस एक पाऊल आणखी पुढे गेला असून तुम्हाला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरही कर लादला जाणार आहे. दरम्यान, पित्रोदा यांच्या विधानावर लागलीच प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोदीं त्यांच्या या विधानावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “रॉयल फॅमिली आणि त्यांच्या प्रिन्सचे सल्लागार (सॅम पित्रोदा) काही काळापूर्वी म्हणाले होते की देशातील मध्यम वर्गावर अधिक कर लादले जायला हवेत. काँग्रेस म्हणते ते आता वारसा कर लागू करणार. तुमच्या मुलांना तुमच्या कष्टाची कमाई मिळणार नाही. ते सगळं काँग्रेसच्या घशात जाणार”, असं मोदी छत्तीसगडमधील सुरगुजा येथील सभेत म्हणाले.

Share: