नाशिक -34 मराठा फ्रेंड रेजिमेंट नाशिक येथे सद्या कार्यरत असलेले किल्लेधारूर तालुक्यातील धुनकवाड गावचे रहिवाशी नाथा छत्रगुण यादव यांचं शनिवारी रात्री नाशिकला ड्युटीवर जाताना संगमनेर ते नाशिक महामार्गावर अपघाती निधन झाल्याने गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली.
धुनकवाडचा जवान नाथा यादव यांचं अपघाती निधन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, नातेवाईकांच्या आक्रोशाचा बांध फुटला------------------------------------------------------किल्लेधारूर-34 मराठा फ्रेंड रेजिमेंट नाशिक येथे सद्या कार्यरत असलेले तालुक्यातील धुनकवाड गावचे रहिवाशी नाथा छत्रगुण यादव यांचं शनिवारी रात्री नाशिकला ड्युटीवर जाताना संगमनेर ते नाशिक महामार्गावर अपघाती निधन झाल्याने गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली. 34 वर्षाचा तरूण आणि कुस्ती, बॅडमिंटनमध्ये नामांकित असलेला जेव्हा अपघातात मृत्यू पावतो तेव्हा नातेवाईकाचा आक्रोशाचा बांध मन हेलावुन टाकणारा होता.त्यांच्यावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुका प्रशासन व सैन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत फौजी रिती रिवाजाप्रमाणे गार्ड ऑफ ऑनर देवुन अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रसंगी हजारो जनसमुदायाची उपस्थिती होती. देशासाठी माझा पती कसा सीमेवर काम करत होता?हे त्यांच्या पत्नी सीमाताईंनी स्वाभिमानाने सांगुन प्रतिक्रिया दिली. बाळु उर्फ नाथा या नावाने ओळखला जाणारा हा सैनिक नाशिक येथे सद्या कार्यरत होता. धिप्पाड शरीरयष्टी आणि मनमिळावु स्वभाव व लहानपणापासुन त्याला क्रीडा विषयी आकर्षण असल्याने कुस्ती खेळात नेहमीच बक्षिस मिळवत असे. पंधरा वर्षापुर्वी तो सैन्य भरती झाल्यानंतर हैद्राबाद, आसाम, डेहराडुन, औरंगाबाद, हिमाचल प्रदेश, कारगीलच्या सीमेवरसुद्धा त्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपलं योगदान दिलं. सैन्यात कुस्ती आणि बॉक्सींग खेळात विविध पारितोषिके मिळवली. कुस्तीसाठी त्याचे चुलते प्रसिद्ध पहिलवान भरत यादव यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभलं. 34 मराठा रेजमेंट अंतर्गत नायक या पदावर ते काम करत होते. काही दिवसापुर्वी नाशिक येथे बदली झाली. सेवेला जाताना शनिवारी रात्री 7 वाजता संगमनेर नाशिक महामार्गावर लोणी-प्रवरा नगरच्या जवळ त्याच्या बुलेट दुचाकी वाहनाला दुधाच्या कंटेनरच्ाी जोरदार धडक बसल्याने जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच धुनकवाड आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली. गावचे माजी सरपंच गोरख यादव यांचा तो पुतण्या आहे. मोठं कुटुंब असल्याने नातेवाईक, मित्र परिवार आणि ग्रामस्थांमध्ये आक्रोशाचा बांध फुटला. स्वभाव मनमिळावु आणि दिलखुलास होता. त्यामुळे बाळु नावाने सर्वांचा लाडका म्हणुन ओळखला जात असे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्यावर फौजी रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक येथील फौजी युनिटचे काही अधिकारी व सहकारी मित्र शिवाय धारूर तहसिलदार यांचीही उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने मानवंदना देवुन पुष्पांजली वाहण्यात आली. दरम्यान त्याचा मृतदेह जेव्हा गावात आणला त्यावेळी प्रचंड आक्रोश व ओक्साबोक्सी महिला आणि नातेवाईक सहन न होण्यापलीकडचं दु:ख व्यक्त करीत होते. देशाच्या रक्षणासाठी आमच्या गावचा सुपुत्र खंबीरपणे लढला त्याचा आम्हाला स्वाभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया छात्रसेनेचे अधिकारी मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी दिले.एवढेच नाही तर प्रचंड दु:ख डोळ्यासमोर असताना मयताच्या पत्नी सीमाताईनं आपल्या पतीने केलेली देशाची सेवा आणि त्यांच्या सोबत अनेक राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात आपण घेतलेला सहभाग याचा स्वाभिमान वाटतो असं सांगितलं तर नाशिक युनिटचे श्री राजेभाऊ खांडे यांच्यासह मित्र परिवारांनी पत्नी, आई-वडिल व मुलाची भेट घेवुन सांत्वन केले. आम्ही सारे सैन्य कुटुंबियासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुचना :- सोबत फोटो पाठवला आहे.