IMG-LOGO
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

Wednesday, Apr 03
IMG

इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंगदरम्यान स्फोट झाल्याने ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ :  आज पहाटे ३ च्या सुमारास छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत तीन महिला, दोन मुले आणि आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.घटनास्थळी अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. हे दुकान छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असून एका तीन मजली इमारतीत आहे. या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.या इमारतीला पहाटे ३ च्या सुमारास अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने आग काही वेळातच पसरली. यात दुकानात वरच्या मळ्यात झोपलेले असळेले एकाच कुटुंबातील सात जण होरपळून ठार झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंगदरम्यान स्फोट झाल्याने ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अशी आहेत मृतांची नावे हमीदा बेगम (वय ५०), शेख सोहेल (वय ३५), वसीम शेख (वय ३०), तन्वीर वसीम (वय २३), रेश्मा शेख (वय २२), आसिम वसीम शेख (वय ३), परी वसीम शेख (वय २) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृतदेह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले असून हे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

Share: