IMG-LOGO
महाराष्ट्र

'ही वॉशिंग मशिनची जाहिरात आहे ना' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचा सुनेत्रा पवार यांच्या क्लिनचीटवर टीका

Wednesday, Apr 24
IMG

अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांना मिळालेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरुनही ठाकरेंनी निशाणा साधला.

नांदेड, दि. २३ : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पहिल्यांदाच एकत्र निवडणुका लढवत आहेत. गेल्या वेळी निवडणुकांनंतर आघाडी स्थापन झाली. तिन्ही पक्षात अत्यंत चांगला ताळमेळ प्रचारात दिसून येत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मविआचे ४८ खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना शिखर बँक कथित घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटविषयी प्रश्न विचारला असता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'ही वॉशिंग मशिनची जाहिरात आहे ना' अशा शब्दात टोला लगावला. तर अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांना मिळालेल्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेवरुनही ठाकरेंनी निशाणा साधला. नांदेड दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भोकर येथे पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. वेगवेगळ्या वाहिन्यावर लागणाऱ्या मालिकांप्रमाणे भाकड जनता पक्षाची २०१४, २०१९ नंतर आता ‘जुमला ३’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेचा अँकर, खलनायक, संहितालेखक तोच आहे. या लोकांनी महाराष्ट्र दहा वर्षांत नासवून टाकला, देश नासवून टाकला. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या गाण्यातील ‘जय भवानी’ हा शब्द हटवणार नाही. मोदींच्या एकाधिकारशाही विरुद्ध सातत्याने बोलत राहणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Share: