IMG-LOGO
साहित्य संमेलन

इगतपुरीत २६-२७ फेब्रुवारीला ग्रामीण साहित्य संमेलन

Sunday, Jan 17
IMG

या संमेलनात कोविड १९ चे सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मालुंजकर यांनी दिली.

नाशिक, दि. १७ जानेवारी : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रूवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.हे दोन दिवसीय साहित्य संमेलन इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात संपन्न होणार आहे.यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा,काव्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या संमेलनात ग्रंथ दिंडी,उद्घाटन सोहळा,पुस्तक प्रकाशन ,पुरस्कार वितरण,परिसंवाद,कथाकथन, खुले कवी संमेलन,असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.यापूर्वी साहित्य मंडळातर्फे विविध ठिकाणी २१ ग्रामीण संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.यंदाचे हे दोन दिवसीय संमेलन  अखिल भारतीय साहित्य संमेलनाची रंगीत तालीम ठरावे. दरवर्षी या संमेलनात नवोदित,ज्येष्ठ साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांनी पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते.या संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक साहित्य प्रेमींनी ९२२६५१९९१३ या क्रमांकावर संपर्क करावा.या संमेलनात कोविड १९ चे सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मालुंजकर यांनी दिली.याप्रसंगी के.पी.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.भाबड़, प्रा. देवीदास गिरी,ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने,विश्वस्त अँड़.ज्ञानेश्वर गुळवे,हिरामण शिंदे,दत्तात्रय झनकर,अँड़.रतनकुमार इचम मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालक भाऊसाहेब पा.खातळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Share: