गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज इमारतीत महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिक दि. २२ जानेवारी : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी अकराला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज इमारतीत महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नाशिकमधील लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकहितवादी मंडळाचे विश्वस्थ हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील, संमेलन संयोजन समितीचे सदस्य विश्वास ठाकूर, डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुनील भुरे, किरण समेळ यांनी केले आहे.