IMG-LOGO
साहित्य संमेलन

साहित्य संंमेलनाच्या ठिकाणास स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी नाव द्या

Wednesday, Jan 27
IMG

संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एकवलय आहे.

नाशिक, दि, २७ जानेवारी  : 94व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिक या पुण्यनगरीस यजमानपद मिळालेले असून आपल्या या भुमीत मायबोली मराठीचे साहित्य संमेलन भरते आहे आनंदाची बाब आहे. साहित्य संंमेलनाच्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्यात यावे अथवा प्रवेशद्वारास किंवा व्यासपीठास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर येथील सावरकर प्रेमींनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एकवलय आहे. नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, उत्कृष्टवक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेकग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, इतर पुस्तकांचेअनुवाद, इतिहासलेखन, भाषाशुद्धी सर्वक्षेत्रात अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्यामुळेच 1938 साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले होते. आजतर एक सुवर्ण योग जुळून आलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात यावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावरआधारित विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे. सावरकरांचे साहित्य जनमानसात पोहोचावे यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात यावी. सावरकरांची जन्मभूमी भगूर तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नाशिक व भगूरमधील काही ठिकाणे तसेच त्यांची ग्रंथसंपदा व मराठी साहित्यातील त्यांचे योगदान याबाबतची एक ध्वनिचित्रफीत संमेलनात दाखविण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.                        

Share: