मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी गोखले एज्यूकेशन सोयायटीच्याकेम्पसमध्ये झाले
नाशिक, दि. २२ जानेवारी : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जागा सरस्वतीच्या प्रागंणात आहे. संमेलनासाठी साहित्यप्रेमी नाशिक मध्ये भेट देणार आहे. यासाठी महापालिकेकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही महापौर कुलकर्णी यांनी दिली. मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी गोखले एज्यूकेशन सोयायटीच्या केम्पसमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, हेमंत टकले, विलास शिंदे, सतीश सोनवणे, लक्ष्मण सावजी, किरण समेट, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोर्हाडे, संजय करंजकर आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ वर्षानंतर नाशिकमध्ये होत असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, हेमंत टकले यांनी मनोगत व्यक्त करत संमेलन यशस्वी होईल यासाठी प्रयत्न केले जाईल असे सांगितले.