आपल्या भारत देशाचे गणितज्ञ आणि खगोल वैज्ञानिक . डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ आणि उत्तम लेखकही. विज्ञान विषयावर लेखन व विज्ञाना चा प्रभाव असलेले साहित्यलेखन सुद्धा.
देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड त्यानिमित्ताने हा परिचय १९ जुलै १९३८ कोल्हापूर येथे जन्म.आपल्या भारत देशाचे गणितज्ञ आणि खगोल वैज्ञानिक . डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ आणि उत्तम लेखकही. विज्ञान विषयावर लेखन व विज्ञाना चा प्रभाव असलेले साहित्यलेखन सुद्धा. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख . आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी . जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे . दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय असा दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांड ला. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.)या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे . तेथे बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या प्राप्त. शिवाय, रँग्लर पदवी आणि खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली फ्रेड हॉईल यांच्य ‘इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी’ संस्था स्थापनेत डॉ. नारळीकरांची महत्वाची भूमिका . १९६६ पासून १९७२ पर्यंत ते या संस्थेत कार्यान्वित होते. या दोन्ही शास्त्रज्ञांनी मिळून गुरुत्वाकर्षणावर एक सिद्धांत मांडला ज्याला ‘हॉईल – नारळीकर सिद्धांत’ असे म्हणतात. तो सिद्धांत सांगतो कि, वस्तूच्या कणांचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणीती असते.१९७२ साली नारळीकर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. टीआयएफआरमध्ये ते सैद्धांतिक खगोलशास्त्रीय ग्रुपचे मुख्य अधिकारी होते. १९८८ मध्ये भारतीय विद्यापीठ अनुदान कमिशनने पुण्यात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र साठी अंतर-विद्यापीठ केंद्राची (आययूसीएए) स्थापन केली आणि नारळीकर आययूसीएएचे संस्थापक संचालक झाले. १९८१ मध्ये, नारळीकर जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. नारळीकर हे त्यांच्या विश्वनिर्मितीशास्त्र मधील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकप्रिय बिग बॅंग मॉडेलसाठी मांडलेले पर्यायी मॉडेल विशेष प्रसिद्ध आहे. ते काही काळ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाच्या विश्वनिर्मितीशास्त्र आयोगाचे अध्यक्ष होते. एनसीईआरटी (शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) द्वारे प्रकाशित होणारी विज्ञान आणि गणित या विषयाची पुस्तके विकसित करण्यासाठी जबाबदार सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून नारळीकर यांची नियुक्ती झाली होती.डॉ. जयंत नारळीकर एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेतच सोबतच ते एक प्रभावी लेखक सुद्धा आहेत. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. वामन परत आला, अंतराळातील भस्मासुर, कृष्णमेघ, प्रेषित, व्हायरस, यक्षाची देणगी, टाईम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव असे अनेक कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले आहेत जे वाचकाला अगदी सुरवातीपासून शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवतात. यक्षाची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय आकाशाशी जडले नाते, विमानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे यासारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली ज्यामुळे साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला विज्ञान आणि गणित सारखे विषय आकलानिय केले. डॉ. नारळीकरांची ही पुस्तके म्हणजे ज्ञानझरा आहे. पण त्यांचे साहित्यिक कार्य मराठी पुरतेच मर्यादित नाही तर ते इतर भारतीय भाषांमधील गणित आणि विज्ञान विषयांची पुस्तके अभ्यासाच्या दृष्टीने सुयोग्य महत्वपूर्ण आहेत.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यां चा सन्मान केला आहे. १९६५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन आणि २००४ मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या सोबत त्यांना डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिरला सन्मान तसेच फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचे पिक्स ज्यूल्स जेन्सन यासारखे अनेक सन्मान त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. डॉ. नारळीकर लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहाधिकारी आहेत तसेच इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीद्वारे देण्यात येणारे इंदिरा गांधी पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयातील त्यांचे साहित्य पहाता, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक दिले आहे.ज्ञान,विज्ञान,साहित्याचे अधिष्ठान लाभलेले विचारवंत,शास्त्रज्ञ आणि साहित्यिक लाभलेले आहेत.त्यांचे नाशिककरांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करते.प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे, नाशिक