पत्रकार परिषदेत दोन दिवस चाललेल्या कामकाजाची माहिती तसेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत महामंडळाचा निर्णय जाहीर करणार आहेत.
नाशिक, दि. २४ जानेवारी : ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक मधील गोखले एज्युकेशनच्या प्रांगणात होणार आहे. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची बैठक सुरू असून बैठकीनंतर संमेलनाध्यक्ष आणि संमेलनाच्या तारखांची घोषणा होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आज दुपारी चार वाजता विद्यानगरी , गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित औषध निर्माण महाविद्यालय (फार्मसी कॉलेज ) येथील साहित्य संमेलनाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत दोन दिवस चाललेल्या कामकाजाची माहिती तसेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत महामंडळाचा निर्णय जाहीर करणार आहेत. यावेळी साहित्य महामंडळाची मागदर्शन निवड समितीची शनिवार पासून नाशिक शहरात सुरु होती. बैठकीत उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनमाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो, प्राचार्य कौतिकराव ठाले- पाटील, औरंगाबाद, डॉ. दादा गोरे औरंगाबाद, डॉ. रामचंद्र काळूंखे, औरंगाबाद, मिलिंद जोशी, पुणे, प्रकाश पायगुडे, पुणे, सुनिता राजे पवार, पुणे, प्राचार्य उषा तांबे, मुंबई, प्रतिभा सराफ, मुंबई, उज्वला मेहंदळे, मुंबई, विलास मानेकर, नागपूर, प्रदीप दाते, वर्धा, गजानन नारे, प्रसाद देशपांडे, बडोदा, सप्रे, भोपाळ, कपूर वासनिक, विलासपुर, भालचंद्र शिंदे आदी सदस्य उपस्थित होते.