IMG-LOGO
राष्ट्रीय

केजरीवालांना धक्का..! ईडीचा छापा पडल्यानंतर दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा

Thursday, Apr 11
IMG

राजकारण बदलले नसून, राजकारणी बदलले आहेत, असे राजीनामा दिल्यानंतर राज कुमार आनंद म्हणाले.

दिल्ली, ‍‍‍‌ दि. ११ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला आहे. आता दिल्ली सरकारमधील मंत्री राज कुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि आपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यानंतर त्यांनी आत मंत्रिमदाचा राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.दिल्ली उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयाने मला जाणवले की, कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी आणि अरविंद यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते म्हणाले होते की, राजकारण बदलले, तर देश बदलेल. परंतु, आज स्थिती वेगळी आहे. अत्यंत खेदाने मला हे सांगावे लागत आहे की, राजकारण बदलले नसून, राजकारणी बदलले आहेत,” असे राजीनामा दिल्यानंतर राज कुमार आनंद म्हणाले.

Share: