IMG-LOGO
क्रीडा

ट्रेलब्लेझर्स संघाने ९ विकेट्सने जिंकला सामना

Thursday, Nov 05
IMG

ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत वेलोसिटीला 15.1 षटकात केवळ 47 धावांवर रोखले. वेलोसिटीकडून शेफाली वर्मा(13), शिखा पांडे(10) आणि ले कॅस्परेक(11) या तिघींनाच दुहेरी आकडा पार करण्यात यश आले.

दुबई, दि. ०५ नोव्हेंबर : विजयासाठी अवघ्या ४८ धावांचं आव्हान मिळालेल्या ट्रेलब्लेझर्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना लेह कास्परेकच्या गोलंदाजीवर ६ धावा काढून माघारी परतली. मात्र यानंतर डेंड्रा डॉटीन आणि रिचा घोष यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत ट्रेलब्लेझर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.या सामन्यात मिताली राज कर्णधार असेलल्या वेलोसिटी संघाने ट्रेलब्लेझर्स संघाला केवळ 48 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डिएंड्रा डॉटीनने आणि रिचा घोष यांनी अनुक्रमे नाबाद 29 आणि 13 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच वेलोसिटीकडून कर्णधार मंधना 6 धावांवरच बाद झाली. तिची विकेट ले कॅस्परेकने घेतली. तत्पूर्वी ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत वेलोसिटीला 15.1 षटकात केवळ 47 धावांवर रोखले. वेलोसिटीकडून शेफाली वर्मा(13), शिखा पांडे(10) आणि ले कॅस्परेक(11) या तिघींनाच दुहेरी आकडा पार करण्यात यश आले. अन्य फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावून बाद झाल्या. कर्णधार मितालीला देखील एकच धाव घेता आली.

Share: