या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
रावळपिंडी, दि. २६ : बांगलादेश क्रिकेट संघाने २५ ऑगस्ट रोजी रावळपिंडी येथे पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली. या संस्मरणीय विजयात बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकर रहीमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात १९१ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला १० विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.