चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफचं आव्हान याआधीच संपुष्टात आलं होतं. चेन्नईच्या टीमला यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला, पण शेवटच्या काही मॅचमध्ये त्यांना सूर गवसला.
दुबई, दि. ०१ नोव्हेंबर : रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत तळाला असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला. महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सलग तीन अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या आयपीएल मोहिमेचा शेवट विजयाने गोड केला. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर लुंगी एनगिडीने सुरुवातीलाच पंजाबला दोन धक्के दिले. यानंतर चेन्नईच्या बाकीच्या बॉलरनीही पंजाबला रोखून धरलं. पण सहाव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने एका बाजूने किल्ला लढवला. हुडाने ३० बॉलमध्ये नाबाद ६२ रन केले. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफचं आव्हान याआधीच संपुष्टात आलं होतं.चेन्नईच्या टीमला यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला, पण शेवटच्या काही मॅचमध्ये त्यांना सूर गवसला, चेन्नईने या मोसमात १४ पैकी ६ मॅच जिंकल्या तर ८ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी या मॅचमध्ये जिंकणे क्रमप्राप्त होतं. चेन्नईने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. चेन्नईच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर पंजाबला केवळ १५३ रन्सचीच मजल मारता आली.