एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रद्द करण्याची दुसरी वेळ आहे. याआधी हा सामना 4 डिसेंबरला खेळण्यात येणार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील खेळाडू थांबलेल्या हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच सामना थोडा उशीरानं सुरु करण्याबाबत एकमत झालं. मात्र, थोड्यावेळानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली.एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रद्द करण्याची दुसरी वेळ आहे. याआधी हा सामना 4 डिसेंबरला खेळण्यात येणार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली. यामुळे पहिल्यांदा हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे हा सामना ६ डिसेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र पुन्हा हा सामना रद्द केला गेला.