या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर रोहनप्रीतने हळदीच्या रंगासारखा कुर्ता घातला आहे.
नवी दिल्ली, दि. २३ ऑक्टोबर : रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंह याच्याशी येत्या २४ ऑक्टोबर रोजी नेहा कक्कर लग्नगाठ बांधणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नेहाच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर रोहनप्रीतने हळदीच्या रंगासारखा कुर्ता घातला आहे. नेहा आपल्या कुटूंबियांसह सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतच तिचा आणि रोहनप्रीत सिंह चा शाही विवाह सोहळा होणार आहे. नेहाचे तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर तिचे नाव उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सोबत जोडले गेले होते. नेहा कक्कर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या समारंभातील कॅमे-यात टिपलेले सुंदर क्षण शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या दोघांच्या चेह-यावरील आनंद, उत्साह अगदी स्पष्टपणे दिसत आहे.