रोहितला कसोटी संघात संधी दिली असली तरी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी त्याला विश्रांतीच देण्यात आली आहे.
मुंबई, दि. ०९ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधीच टीम निवडीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रोहित शर्माला दुखापतग्रस्त म्हणून जाहीर करून त्यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने राजकारण केल्याचा आरोप सोशल मिडियावर करण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा संघामध्ये काही बदल करून रोहित शर्माचा कसोटी समावेश करण्यात आला आहेभारताच्या मेडिकल टीमकडून बीसीसीआयला खेळाडूंच्या दुखापतीचे अहवाल मिळाल्यानंतर बीसीसीआयने हे बदल केले आहेत. रोहितला कसोटी संघात संधी दिली असली तरी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी त्याला विश्रांतीच देण्यात आली आहे. विराट कोहली अॅडलेडमधल्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात तो बाबा होणार आहे. बीसीसीआयकडून विराटला पॅटनिर्टी लिव्ह मंजूर करण्यात आली आहे.