महायुतीच्या विजयानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई, दि.२६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपचे वरिष्ठ नेते या बाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राजभावनात पोहोचले असून शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. दरम्यान, शिंदे यांच्या एका पोस्टमुळे चरनचांना उधाण आले आहे. शिंदे यांनी आपल्या समर्थकांना निवासस्थानाबाहेर जल्लोष करू नये, असे आवाहन केले आहे. महायुतीच्या विजयानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे.