IMG-LOGO
क्रीडा

बँगलोर विरुद्ध हैदराबाद : हैदराबादची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी

Friday, Nov 06
IMG

पराभूत संघाचं आव्हान इथेच संपुष्टात येणार आहे. हैदराबादने आपल्या संघात एक बदल केला असून RCB ने महत्वपूर्ण सामन्यात ४ बदल केले आहेत.

दुबई, दि. ०६ नोव्हेंबर : हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ दिल्लीसोबत दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात खेळणार आहे, तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपुष्टात येणार आहे. हैदराबादने आपल्या संघात एक बदल केला असून RCB ने महत्वपूर्ण सामन्यात ४ बदल केले आहेत.रविवारी होणाऱ्या क्वालिफायर-2 च्या या सामन्यात ज्याचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळेल.सलग तीन विजयांसह इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीचे स्थान निश्चित करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचे शुक्रवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात पारडे जड मानले जात आहे.  हैदराबादने अखेरच्या तीन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, बेंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांना हरवून आजच्या सामन्यात मोठ्या दमाने उतरली आहे. 

Share: