IMG-LOGO
महाराष्ट्र

विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान

Thursday, Jun 27
IMG

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई, दि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७१.८७ टक्के इतके सरासरी मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६३ टक्के, मुंबई पदवीधर मतदारसंघात ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ७५ टक्के तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात ९३.४८ टक्के इतके मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नमूद केले. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. 

Share: