जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.
रुपेरी पडद्यावर जेम्स बाँडची व्यक्तिरेखा अजरामर करणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. ते ९० वर्षांचे होते.मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शॉन कॉनरी हेच पहिल्यांदा जेम्स बाँड हे पात्र रंगवताना रुपेरी पडद्यावर दिसले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली. शॉन कॉनरी यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० रोजी ब्रिटनमध्ये झाला होता. १९६२ ते १९८३ या कालावधीतील त्यांनी बाँडपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.